येऊनियां जन्मा एक – संत जनाबाई अभंग – १७४
येऊनियां जन्मा एक ।
करा देहाचें सार्थक ॥१॥
वाचे नाम विठ्ठलाचें ।
तेणें सार्थक जन्माचें ॥२॥
ऐसा नामाचा महिमा ।
शेष वर्णितां झाली सीमा ॥३॥
नाम शास्त्रीं त्रिभुवनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
येऊनियां जन्मा एक ।
करा देहाचें सार्थक ॥१॥
वाचे नाम विठ्ठलाचें ।
तेणें सार्थक जन्माचें ॥२॥
ऐसा नामाचा महिमा ।
शेष वर्णितां झाली सीमा ॥३॥
नाम शास्त्रीं त्रिभुवनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥