पतंग सुखावला भारी – संत जनाबाई अभंग – १७३
पतंग सुखावला भारी ।
उडी घाली दीपावरी ॥१॥
परि तो देहांतीं मुकला ।
दोहीं पदार्थी नाडिला ॥२॥
विषयांचे संगती ।
बहु गेले अधोगती ॥३॥
ऐसे विषयानें भुलविले ।
जनी म्हणे वांयां गेले ॥४॥
पतंग सुखावला भारी ।
उडी घाली दीपावरी ॥१॥
परि तो देहांतीं मुकला ।
दोहीं पदार्थी नाडिला ॥२॥
विषयांचे संगती ।
बहु गेले अधोगती ॥३॥
ऐसे विषयानें भुलविले ।
जनी म्हणे वांयां गेले ॥४॥