आपणची सारा । पाहावें कीं नारीनरां ॥१॥ पटाकारणे हे जनी । पांडुरंग तंतु मनीं ॥२॥ भावेंवीण भजलें । भिउनियां झांकीं डोळे ॥३॥ म्हणे काय पाहूं येतें । भिन्न नव्हे वस्तु जेथें ॥४॥ भिन्नाभिन्न नाहीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥