आपणची सारा – संत जनाबाई अभंग – १६६
आपणची सारा ।
पाहावें कीं नारीनरां ॥१॥
पटाकारणे हे जनी ।
पांडुरंग तंतु मनीं ॥२॥
भावेंवीण भजलें ।
भिउनियां झांकीं डोळे ॥३॥
म्हणे काय पाहूं येतें ।
भिन्न नव्हे वस्तु जेथें ॥४॥
भिन्नाभिन्न नाहीं मनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥५॥