अंगीं हो पैं शांती । दया क्षमा सर्वांभूतीं ॥१॥ जेथें जाऊन पाहे देवा । ब्रह्मादिक करिती सेवा ॥२॥ आवडी असे पैं कीर्तनीं । लवे संतांचे चरणीं ॥३॥ जैसी दया पुत्रावरी । तेंचि पाहे चराचरीं ॥४॥ बहु अपराध केला । म्हणे जनी तो रक्षिला ॥५॥