जगीं विठ्ठल रुक्मिणी । तुह्मी अखंड स्मरा ध्यानी ॥१॥ मग तुज काय उणें । झाले सोयरे त्रिभुवनें ॥२॥ साराचें जें सार । भवसिंधु उतरी पार ॥३॥ मन ठेउनी चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥