चोरा संगतींनें गेला । वाटे जातां नागवला ॥१॥ तैसी सांडोनियां भक्ती । धरी विषयाची संगती ॥२॥ अग्निसवें खेळे । न जळे तो परी पोळे ॥३॥ विश्वासला चोरा । जनी म्हणे घाला बरा ॥४॥