चोरा संगतींनें गेला – संत जनाबाई अभंग – १६१
चोरा संगतींनें गेला ।
वाटे जातां नागवला ॥१॥
तैसी सांडोनियां भक्ती ।
धरी विषयाची संगती ॥२॥
अग्निसवें खेळे ।
न जळे तो परी पोळे ॥३॥
विश्वासला चोरा ।
जनी म्हणे घाला बरा ॥४॥
चोरा संगतींनें गेला ।
वाटे जातां नागवला ॥१॥
तैसी सांडोनियां भक्ती ।
धरी विषयाची संगती ॥२॥
अग्निसवें खेळे ।
न जळे तो परी पोळे ॥३॥
विश्वासला चोरा ।
जनी म्हणे घाला बरा ॥४॥