भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ । शरिरें अनाढळ केली आळी ॥१॥ काय तिनें तपमुद्रा धरियेली । ह्मणोनियां झाली भृंगी अंगें ॥२॥ अरे बा शहाणिया तैसा करीं जप । संतयोगें पाप नाहीं होय ॥३॥ नामयाची जनी पिटिती डांगोरा । संदेह न धरा करा पूजा ॥४॥