भृंगीचिया अंगीं कोणतें – संत जनाबाई अभंग – १५८
भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ ।
शरिरें अनाढळ केली आळी ॥१॥
काय तिनें तपमुद्रा धरियेली ।
ह्मणोनियां झाली भृंगी अंगें ॥२॥
अरे बा शहाणिया तैसा करीं जप ।
संतयोगें पाप नाहीं होय ॥३॥
नामयाची जनी पिटिती डांगोरा ।
संदेह न धरा करा पूजा ॥४॥