झाली जगाचिये सीमा । वस्तुभाव येर व्योमा ॥१॥ पहा हो अधिकारी । नको असोनी भिकारी ॥२॥ पट तंतूंचा घडला । घट मृत्तिकेचा झाला ॥३॥ पहा श्वानसमची पंडित । जनी म्हणे एकचि मात ॥४॥