भक्तिभावें वळे गा देव । महाराज पंढरिराव ॥१॥ पंढरीसी जावें । संतजना भेटावें ॥२॥ भक्ति आहे ज्याचें चित्तीं । त्याला पावतो निश्चिती ॥३॥ भाव धरा मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥