धन्य धन्य ज्याचे चरणीं गंगाओघ झाला । मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥ धुंडितां ते पाय शिणला तो ब्रह्मा । बोल ठेवी कर्मा आपुलीया ॥२॥ शुक सनकादिक फिरती हरिजन । नारदादि गाणें जयासाठीं ॥३॥ ते चरण आह्मांसी गवसले अनायासी । धन्य झाली दासी जनी म्हणे ॥४॥