मी तों समर्थाची दासी । मिठी घालीन पायांसीं ॥१॥ हाचि माझा दृढभाव । करीन नामाचा उत्सव ॥२॥ आह्मां दासीस हें काम । मुखीं विठ्ठल हरिनाम ॥३॥ सर्व सुख पायीं लोळे । जनीसंगें विठ्ठल बोले ॥४॥