करूं हरीचें कीर्तन । गाऊं निर्मळ ते गुण ॥१॥ सदा धरुं संतसंग । मुखीं ह्मणूं पांडुरंग ॥२॥ करुं जनावरी कृपा । रामनाम म्हणवूं लोकां ॥३॥ जनी म्हणे कीर्ति करुं । नाम बळकट धरुं ॥४॥