करूं हरीचें कीर्तन – संत जनाबाई अभंग – १४५
करूं हरीचें कीर्तन ।
गाऊं निर्मळ ते गुण ॥१॥
सदा धरुं संतसंग ।
मुखीं ह्मणूं पांडुरंग ॥२॥
करुं जनावरी कृपा ।
रामनाम म्हणवूं लोकां ॥३॥
जनी म्हणे कीर्ति करुं ।
नाम बळकट धरुं ॥४॥
करूं हरीचें कीर्तन ।
गाऊं निर्मळ ते गुण ॥१॥
सदा धरुं संतसंग ।
मुखीं ह्मणूं पांडुरंग ॥२॥
करुं जनावरी कृपा ।
रामनाम म्हणवूं लोकां ॥३॥
जनी म्हणे कीर्ति करुं ।
नाम बळकट धरुं ॥४॥