सत्त्वरजतमें असे हें बांधिलें । शरीर दृढ झालें अहंकारें ॥१॥ सांडीं अहंकार धरीं दृढभाव । ह्रुदयीं पंढरिराव धरोनियां ॥२॥ नामयाची जनी भक्तीसी भुलली । ते चरणीं राहिली विठोबाचे ॥३॥