सत्त्वरजतमें असे हें – संत जनाबाई अभंग – १४३
सत्त्वरजतमें असे हें बांधिलें ।
शरीर दृढ झालें अहंकारें ॥१॥
सांडीं अहंकार धरीं दृढभाव ।
ह्रुदयीं पंढरिराव धरोनियां ॥२॥
नामयाची जनी भक्तीसी भुलली ।
ते चरणीं राहिली विठोबाचे ॥३॥
सत्त्वरजतमें असे हें बांधिलें ।
शरीर दृढ झालें अहंकारें ॥१॥
सांडीं अहंकार धरीं दृढभाव ।
ह्रुदयीं पंढरिराव धरोनियां ॥२॥
नामयाची जनी भक्तीसी भुलली ।
ते चरणीं राहिली विठोबाचे ॥३॥