आतां भीत नाहीं देवा । आदि अंत तुझा ठावा ॥१॥ झालें नामाचेनि बळकट । तेणें वैकुंठ पायवाट ॥२॥ ज्ञान वैराग्य विवेक बळें । तें तंव अह्मांसवें खेळे ॥३॥ दया क्षमा आम्हांपुढें । जनी म्हणे झाले वेडे ॥४॥