तूझा लोभ नाहीं देवा । तुझी करिना मी सेवा ॥१॥ नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥ रागा येउनी काय करिशी । तुझें बळ आह्मांपाशीं ॥३॥ नाहीं सामर्थ्य तुज हरी । जनी म्हणे धरिली चोरी ॥४॥