तूझा लोभ नाहीं देवा – संत जनाबाई अभंग – १३५
तूझा लोभ नाहीं देवा ।
तुझी करिना मी सेवा ॥१॥
नाहीं अंगीं थोरपण ।
मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रागा येउनी काय करिशी ।
तुझें बळ आह्मांपाशीं ॥३॥
नाहीं सामर्थ्य तुज हरी ।
जनी म्हणे धरिली चोरी ॥४॥
तूझा लोभ नाहीं देवा ।
तुझी करिना मी सेवा ॥१॥
नाहीं अंगीं थोरपण ।
मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रागा येउनी काय करिशी ।
तुझें बळ आह्मांपाशीं ॥३॥
नाहीं सामर्थ्य तुज हरी ।
जनी म्हणे धरिली चोरी ॥४॥