जात्यावरील गीतासी – संत जनाबाई अभंग – १३४
जात्यावरील गीतासी ।
दळणमिशें गोवी दासी ॥१॥
देह बुद्धीचें वैरण ।
बरवा दाणा हो निसून ॥२॥
नामाचा हो कोळी ।
गुरु आज्ञेंत मी पाळीं ॥३॥
मज भरंवसा नाम्याचा ।
गजर दासी जनीचा ॥४॥
जात्यावरील गीतासी ।
दळणमिशें गोवी दासी ॥१॥
देह बुद्धीचें वैरण ।
बरवा दाणा हो निसून ॥२॥
नामाचा हो कोळी ।
गुरु आज्ञेंत मी पाळीं ॥३॥
मज भरंवसा नाम्याचा ।
गजर दासी जनीचा ॥४॥