चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवर पाहूं ॥१॥ स्नान करुं भिवरेसी । पुंडलिका पायांपाशीं ॥२॥ डोळे भरून पाहूं देवा । तेणें ईश्वर जीवाभावा ॥३॥ ऐसा निश्चय करुनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥