Categories: जनाबाई

दळितां कांडितां – संत जनाबाई अभंग – १३१

दळितां कांडितां – संत जनाबाई अभंग – १३१


दळितां कांडितां ।
तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंबें क्षणभरी ।
तुझें नाम गा मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार ।
मुखीं हरि निरंतर ॥३॥
मायबाप बंधुबहिणी ।
तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागलें चरणासी ।
म्हणे नामयाची दासी ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दळितां कांडितां – संत जनाबाई अभंग – १३१

View Comments

  • मी काहीही काम करीत असेल मग ते दळितां कांडण असेल पण हे अनंता मी
    तुझे नामच गाईन.
    हे मुरारी , क्षणभरी ही न विसंबता तुझ्या नामाचा उच्चार करेल.
    आणि हे माझे एक दिवसाचे नसुन
    नित्य हाच कारभार असेल की
    मुखीं हरिचे नाव निरंतर घेईन.
    कारण चक्रपाणी तुच मायबाप बंधुबहिण , सखा आहेस.
    नामयाची दासी म्हणते हे देवा आता माझे लक्ष फक्त आणि फक्त तुझ्या चरणासी लागले आहे .