नाहीं आकाश घडणी । पाहा स्वरुपाची खाणी ॥१॥ स्वरुप हें अगोचर । गुरू करिती गोचर ॥२॥ गोचर करिताती जाणा । दृष्टि दिसे निरंजना ॥३॥ नाहीं हात पाय त्यासी । जनी म्हणे स्वरुपासी ॥४॥