नाहीं आकाश घडणी – संत जनाबाई अभंग – १२९
नाहीं आकाश घडणी ।
पाहा स्वरुपाची खाणी ॥१॥
स्वरुप हें अगोचर ।
गुरू करिती गोचर ॥२॥
गोचर करिताती जाणा ।
दृष्टि दिसे निरंजना ॥३॥
नाहीं हात पाय त्यासी ।
जनी म्हणे स्वरुपासी ॥४॥
नाहीं आकाश घडणी ।
पाहा स्वरुपाची खाणी ॥१॥
स्वरुप हें अगोचर ।
गुरू करिती गोचर ॥२॥
गोचर करिताती जाणा ।
दृष्टि दिसे निरंजना ॥३॥
नाहीं हात पाय त्यासी ।
जनी म्हणे स्वरुपासी ॥४॥