ज्योत पहा झमकली । काय सांगूं त्याची बोली ॥१॥ प्रवृत्ति निवृत्ति दोघीजणी । लीन होती त्याच्या चरणीं ॥२॥ परापश्यंती मध्यमा । वैखरेची झाली सीमा ॥३॥ चारी वाचा कुंठित जाहाली । सोहं ज्योत प्रकाशली ॥४॥ ज्योत परब्रह्मीं जाणा । जनी म्हणे निरंजना ॥५॥