शून्यावरी शून्य पाहे । तयावरी शून्य आहे ॥१॥ प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचें नांव अधःशून्य ॥२॥ उर्ध्वशून्य श्वेतवर्ण | मध्य शून्य शामवर्ण ॥३॥ महा शून्य वर्ण नीळ । त्यांत स्वरुप केवळ ॥४॥ अनुहात घंटा श्रवणीं । ऐकुनी विस्मय जाहाली जनी ॥५॥