रक्तवर्ण त्रिकुट स्नान – संत जनाबाई अभंग – १२५
रक्तवर्ण त्रिकुट स्नान । श्रीहाट पाहे श्वेतवर्ण ॥१॥ शामवर्ण तें गोलाट । निळबिंदु औट पीट ॥२॥ वरि भ्रमर गुंफा पाहे । दशमद्वारीं गुरु आहे ॥३॥ नव द्वारातें भेदुनी । दशमद्वारीं गेली जनी ॥४॥