काळाचिये लेख । नाहीं ब्रह्माविष्णु मुख्य ॥१॥ युगा एक लव झडे । तोही न सरे काळापुढें ॥२॥ अविद्येनें नवल केलें । मिथ्या देह सत्य केलें ॥३॥ महीपाळ स्वर्गपाळ । तेही ग्रासले समूळ ॥४॥ वर्म चुकलीं बापुडीं । दासी जनी विठ्ठल जोडी ॥५॥