गगन सर्वत्र तत्वता – संत जनाबाई अभंग – १२३
गगन सर्वत्र तत्वता ।
त्यासी चिखल लावूं जातां ॥१॥
तैसा जाण पांडुरंग ।
भोग भोगुनी निःसंग ॥२॥
सिद्ध सनकादिक ।
गणगंधर्व अनेक ॥३॥
जैसी वांझेची संतती ।
तैसी संसार उत्पत्ती ॥४॥
तेथें कैंचें धरिसी ध्यान ।
दासी जनी ब्रह्म पूर्ण ॥५॥