नित्य हातानें वारावें – संत जनाबाई अभंग – १२२
नित्य हातानें वारावें ।
ह्रुदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥
ऐसा स्वरुपाचा पूर ।
आला असे नेत्रावर ॥२॥
स्वरुपाचा पूर आला ।
पाहातां डोळा झाकूळला ॥३॥
जनी म्हणे ऐसा पूर ।
पाहें तोचि रघुवीर ॥४॥
नित्य हातानें वारावें ।
ह्रुदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥
ऐसा स्वरुपाचा पूर ।
आला असे नेत्रावर ॥२॥
स्वरुपाचा पूर आला ।
पाहातां डोळा झाकूळला ॥३॥
जनी म्हणे ऐसा पूर ।
पाहें तोचि रघुवीर ॥४॥