देव खाते देव पीते – संत जनाबाई अभंग – ११८
देव खाते देव पीते ।
देवावरी मी निजतें ॥१॥
देव देते देव घेते ।
देवासवें व्यवहारिते ॥२॥
देव येथें देव तेथे ।
देवाविणें नाहीं रीतें ॥३॥
जनी म्हणे विठाबाई ।
भरुनि उरलें अंतरबाहीं ॥४॥
देव खाते देव पीते ।
देवावरी मी निजतें ॥१॥
देव देते देव घेते ।
देवासवें व्यवहारिते ॥२॥
देव येथें देव तेथे ।
देवाविणें नाहीं रीतें ॥३॥
जनी म्हणे विठाबाई ।
भरुनि उरलें अंतरबाहीं ॥४॥