अखंडित ध्यानीं । पांडुरंग जपे वाणी ॥१॥ पांडुरंग नाम जपे । हेंचि माझें महा तप ॥२॥ ऐसें आलें प्रत्ययासी । सहज तेणें तत्त्वमसी ॥३॥ पावलिया हो स्वपद । सहज विराला तो शब्द ॥४॥ संदेह अवघाचि फिरला । जनी म्हणे उदयो झाला ॥५॥