Categories: जनाबाई

नम्रतेविण योग्यता मिरविती – संत जनाबाई अभंग – ११५

नम्रतेविण योग्यता मिरविती – संत जनाबाई अभंग – ११५

नम्रतेविण योग्यता मिरविती ।
ते केवीं पावती ब्रह्मसुख ॥१॥
लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती ।
ते केवीं पावती केशवातें ॥२॥
एक संत म्हणविती नग्न पैं हिंडती ।
अंतरींची स्थिति खडबड ॥३॥
झालेपणाचे गुण दिसताती सगुण ।
वस्तु ते आपण होऊनि ठेली ॥४॥
सागरीं गंगा मिळोनि गेली जैसी ।
परतोनि तियेसी नाम नाहीं ॥५॥
नामयाची जनी निर्गुणीं बोधिली ।
ठेवा जो लाधली पांडुरंग ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नम्रतेविण योग्यता मिरविती – संत जनाबाई अभंग – ११५