भक्त जें जें कर्म करिती – संत जनाबाई अभंग – ११भक्त जें जें कर्म करिती ।
तें तूं होसी कृपामूर्ती ॥१॥ हें तों नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ॥२॥ वाग्दोर धरुनी दांतीं । चारी घोडे चहूं हातीं ॥३॥ धूतां लाज नाहीं तुला । दासी जनी ह्मणे भला ॥४॥