भ्रांती माझें मन प्रपंचीं – संत जनाबाई अभंग – १०९
भ्रांती माझें मन प्रपंचीं गुंतलें ।
श्रवण मनन होउनी ठेलें ॥१॥
बापें बोधिलें बापें बोधिली ।
बोधुनी कैसी तद्रुप झाली ॥२॥
निज्रध्यासें कैसा अवघाचि सांपडला ।
कीं विश्वरुपीं देखिला बाईयांनो ॥३॥
नामयाची जनी स्वयंबोध झाला ।
अवघाचि पुसिला ठाव देखा ॥४॥