वैराग्य अभिमानें फिरविलें – संत जनाबाई अभंग – १०८
वैराग्य अभिमानें फिरविलें जातें ।
ह्मणवोनी यातें भाव खुंटा ॥१॥
संचित मातृका वैरणी घातली ।
अव्यक्तिं दळिलीं व्यक्ताव्यक्त ॥२॥
नामरुपा आदि दळियेलें सर्व ।
पीठ भरी देव पंढरीचा ॥३॥
नवल हा देव बैसला दळणीं ।
नाहीं केली जनी नामयाची ॥४॥