द्ळूं कांडूं खेळूं – संत जनाबाई अभंग – १०६
द्ळूं कांडूं खेळूं ।
सर्व पाप ताप जाळूं ॥१॥
सर्व जिवामध्यें पाहूं ।
एक आह्मी होउनी राहूं ॥२॥
जनी म्हणे ब्रह्म होऊं ।
ऐसें सर्वांघटी पाहूं ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
द्ळूं कांडूं खेळूं – संत जनाबाई अभंग – १०६