वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रुपडें ॥१॥ आतां खाले पाहूं जरी । चहूंकडे दिसे हरी ॥२॥ चराचरीं जें जें दिसे । तें तें अविद्याची नासे ॥३॥ माझें नाठवे मीपण । तेथें कैंचें दुजेपण ॥४॥ सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥