संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥ तेथें असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ॥२॥ रंग भरे कीर्तनांत । प्रेमें हरिदास नाचत ॥३॥ सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचें जो जिव्हार ॥४॥ ऐशा संतां शरण जावें । जनी म्हणे त्याला ध्यावें ॥५॥