झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥ पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥ ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥ जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥