अग्नि जाळी तरी न – संत जगमित्र नागा अभंग – १
अग्नि जाळी तरी न – संत जगमित्र नागा अभंग – १
अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु।
हृदयी गोविंदु म्हणोनिया॥ १॥
आग्नि जाळी तरी न जळे गोपाळु ।
हृदयी देवकी बाळू म्हणोनिया॥ २॥
अग्नि जाळी तरी न जळती पांडव।
हृदयी वासुदेव म्हणोनिया॥३॥
जगमित्र नागा न जळे जरी अग्नि जाळी।
हृदयी वनमाळी म्हणोनिया ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अग्नि जाळी तरी न – संत जगमित्र नागा अभंग – १