कीर्तनकार/ प्रवचनकार

ह.भ.प सोनालीताई महाराज मोरे-कापसे

ह.भ.प सोनालीताई महाराज मोरे-कापसे (संत तुकाराम महाराज वंशज)देहु


मो :- 7038920920

सेवा :- किर्तनकार

पत्ता :- रा.देहु जि . पुणे

सविस्तर माहिती :- ताई चे असे वयक्तिक मत आहे कि आपल्याला संप्रदायातील परमार्थाची वाढत चाललेले रंगी सोंगी,ढोंगी व परमार्थातील घटत चाललेली खोली. ताई म्हणतात आपली आपण करावी सोडवण.परंतु काही ना योग्य परमार्थीक प्रवाहात आणणे जरुरी आहे. ताई चा जन्म संत तुकाराम महाराजांच्या घरात झाला.आज त्या वयाच्या दहाव्या वर्षांपासुन किर्तन, प्रवचन अखंड सेवा देत आहेत .महाराष्ट्रभर सेवा देत असताना हे प्रकर्षाने जाणवले कि,महिलांना परमार्थात कुचंबणा केली जाते, महिलांना हिनतेची वागणूक देतात, काही ठिकाणी तर टाळ,विना ही घेऊ दिला जात नाही,याच्याही पुढे काही ठिकाणी तर महिलांच्या किर्तन, प्रवचन सेवा ही नाकारले जातात. मायबापहो महिलांना हिन लेखने हे यांचे धोतांड आहे.सात जन्माचा परमार्थ बुडतो.असे कुठेही नाही महिलांनी परमार्थ करु नये. संत तुकाराम महाराज म्हणतात की यारे यारे लहान थोर…..येथे सकळां शी आहे अधिकार.मग आपण का महिलांची कुचंबणा करतो. मायबापहो आपल्या हिंदु धर्मात कुठल्याही धार्मिक विधी,पुजाअर्चा,होमवहन,अगदी सप्ताह ची सुरुवात करताना ही महिला असल्यशिवाय पूर्णतः होत नाही. काही ठिकाणी तर म्हणतात हनुमानाला महिलाचा स्पर्श ही चालत नाही, कारण रामभक्त हनुमान प्रत्येक स्त्रीला आईसमान मानत आहे. मायबापहो असे अनेक उदा.आहेत, ते देणे शक्य नाही. आपल्या हिंदू धर्मात असे कुठलेही दैवत नाही तेथे स्त्रियांना मानसन्मान नाही.मग का तुम्ही महिला ना परमार्थात आड येता,का तुम्ही महिलांना सेवांसाठी आड येता.विणा घेतांना ज्या नारदगादी सेवा घेता ना,तोच विणा हा पहिला एका स्त्रीच्या हातात होता, ती स्त्री म्हणजे माता सरस्वती. मग का महिलांना किर्तन, प्रवचन सेवा साठी आडकाठि आणता.आपल्याला जर महिलांचा अनादर वाटतंय,हिन लेखकता तर मग कशाला धार्मिक कार्यक्रम साठी महिला ना बोलवता करा पुरुषांनी सप्ताह, चालेल का. आजही महिलांची धार्मिक कार्यक्रमात संख्या जास्त आहे. पहिल्यापासून अविचारी अशा धोतांड विचारसरणी मुळे परमार्थाची खोली कमी होत आहे.
आता मायबापहो परमार्थीक चळवळ करणे निकडीचे आहे, जागे झाले पाहिजे.
गावचे सरपंच, पदाधिकारी, महिला वर्ग, सप्ताह कमेटी, भजनी मंडळ, अन्य परमार्थीक सेवा मंडळ आणि आणि विशेष करून सेवा देणारे महाराज मंडळी यांना संत तुकाराम महाराजांच्या घरातुन सोनालीताईताई मोरे हात जोडून आवाहन करत आहे कि,जिथे जिथे नुसते पुरुषांर्थीच सप्ताह मध्ये पुरुषांच्या सेवा होत असेल तेथे आपण त्यांना सुचवा कि,मुक्ताबाई,मिराबाई,सखुबाई,यांच्या सेवा घेत जावे. नक्कीच परमार्थाला चालना मिळेल.
परंतु आज संप्रदाय मध्ये जे मोठ मोठे हरिकथा, किर्तन, प्रवचन सांगणारे जसे मोठ मोठे जड जड शब्द वापरता तसे आजपर्यंत एकही हरिकथा, किर्तन, प्रवचन सांगणारे महिलांच्या सेवा घ्या कार्यक्रमांतुन का सांगत नाही,मला तर वाटते यांना गळू झालेला आहे.मी टिका वा निंदा करत नाही.समाजात परिवर्तन का होत नाही,दोन चाकाशिवाय साधन चालत नाही तसेच परमार्थात हि स्त्री आणि पुरुष महत्त्वाचे आहे, आजपर्यंत आपण एकचाकी लंगडा सप्ताह करत आलाय,यांना वाटत असावं कि,महिलांच्या सेवा सुरु झाल्या तर आपले काय.महिलांना आपण हिन समजल्या मुळे,अहंकार, मी पणा, द्वेष,निंदा यामुळेच संप्रदायात अशी स्थिती आहे,काही काही तर स्वतःला विश्वगुरू,जगद्गुरू,मोठे माऊली, छोटे माऊली, धाकटे माऊली, सुट्टे माऊली स्वतःला पदवी लावून बसलेत,काही तर जि.ता.टोळक्याचे अध्यक्ष उपाध्या.राजकारणात ऐवढे पदे नाही ऐवढे यांनी तयार केलेत.साधुसंतांच्या राज्यात आजपर्यंत कुणी साधुसंतांनी पद लावली नाही ती समाजाने दिली आहेत,छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले कधीच स्वतः चे नाव दिले नाही. हि निंदा नाही, स्थिती अशीच राहिली तर थोड्याच कालावधीत समाज कार्यक्रम च्या निमित्ताने महाराजांच्या सेवाही मोठ्या स्क्रीनवर पाहयला सुरुवात करतील.काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. यांसाठी जास्तीत जास्त पुढाकार पंढरपूर, आळंदी,देहू, त्रिबंकेश्वर,या संस्थानानीही व इतर सर्व संस्थानानी घेणे महत्त्वाचे आहे.

View Comments

  • कोणाही जीवाचा न घडो मत्सर |वर्म सर्वेश्वर पुजनाचे||
    कोणाचाही व्देश न करता सर्वाना आधिकारदिला पाहिजे .संत जनाई ,मुक्ताई काय भजन पुजन करत नव्हत्या काय?