निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें – संत गोरा कुंभार अभंग
निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें । तंव झालो प्रसंगीं गुणातीत ॥ १ ॥
मज रूप नाहीं नांव सांगू काई । झाला बाई बोलूं नये ॥ २ ॥
बोलतां आपली जिव्हा पैं खादली । खेचरी लागली पाहतां पाहतां ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी । सुखासुखी मिठी पडली कैसी ॥ ४ ॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत गोरा कुंभार अँप डाउनलोड करा.