नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा – संत गोरा कुंभार अभंग

नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा – संत गोरा कुंभार अभंग


नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा । आवरण आरूपा कोण ठेवी ॥ १ ॥
तूं गुह्य चैतन्य नित्य वस्तु जाण । रहित कारण स्वयंप्रकाश ॥ २ ॥
याही शब्दामाजी वाचा न लागे । मार्ग पैं गा लागे निर्धारिता ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा । चिद्रूप अवघा दिससी साच ॥ ४ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

संत गोरा कुंभार अँप डाउनलोड करा.