केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं – संत गोरा कुंभार अभंग

केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं – संत गोरा कुंभार अभंग


केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं ।
मृत्तिके माझारीं नाचतसे ॥ १ ॥
विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ ।
नेत्रीं वाहे जळ सद्‍गदीत ॥ २ ॥
कुलालाचे वंशीं जन्मलें शरीर ।
तो गोरा कुंभार हरिभक्त ॥ ३ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

संत गोरा कुंभार अँप डाउनलोड करा.