कायसास बहु घालिसील माळ ।
तुज येणेविण काय काज ॥ १ ॥
एकपणें एक एकपणें एक ।
एकाचें अनेक विस्तारिलें ॥ २ ॥
एकत्व पाहतां शिणलें धरणीधर ।
न चुके येरझारा संसाराची ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार कोणी नाहीं दुजें ।
विश्वरूप तुझें नामदेवा ॥ ४ ॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत गोरा कुंभार अँप डाउनलोड करा.