लेख

गाडगेबाबा कविता

गाडगेबाबा कविता विडिओ सहित

कीती पुजला देव तरी,
देव अजुन पावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही..||धृ ||
मंदिरासमोर लुटली इज्जत,
हा बघत बसला पोरीला,
रक्षण करतो म्हणाला, अन् स्वत:च गेला चोरीला,
हातात असुन धारदार शस्र,
कधी चोरामागे धावला नाही..
कुठं राहतो कुणांस ठाऊक अजुनपर्यंत घावला नाही…||१||

सगळं काही तोच देतो,
तोच पुरवतो सगळ्यांची हौस…
शेतक़री बघतो आभाळांकडं,
मग गेला कुठं पाऊस…
खुप केलं हरी हरी तरी,
मुखांत कधी मावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही…||२||

कधी स्वत: राहून उपाशी, भुक त्याची भागवली…
हा म्हणे नैवद्यावर थोडी,
साखर का नाही मागवली…
आहार त्याचा वाढतं गेला,
कधी एका बक-यावर भागला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही…||३||

आंघोळ करतो दुधाने,
जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या…
तोच घागरी भरतो म्हणे,
पुण्य अन् पापाच्या…
पाप-पुण्याचा हीशोब कधी,
त्यानं दावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत मला घावला नाही…||४||
संत गाडगे महाराज

गाडगेबाबा कविता समाप्त


हे पण वाचा: संत गाडगे महाराज संपूर्ण माहिती 



शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या