योगिनी एकादशी (yogini ekadashi) संपूर्ण माहिती विडिओ सहित मराठी
दरवर्षी 24 एकादशी व्रत करण्याची प्रथा आहे. ज्या वर्षी मलमास किंवा पुरुषोत्तम मास येतो त्या वर्षी याची संख्या वाढून 26 होते. त्यातून ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणार्या एकादशीला योगिनी एकादशी (yogini ekadashi) म्हणतात. हिंदू धर्माप्रमाणे ही एकादशी सर्व पापांपासून मुक्ती देणारी आहे. तर जाणून घ्या या व्रताबद्दल महत्त्तवाची माहिती:
योगिनी एकादशी व्रतकथा पद्मपुराणात उत्तरांखडमध्ये प्राप्त होते. आषाढ महिन्यातील कृष्ण एकादशीला योगिनी अथवा शयनी एकादशी म्हणतात. या व्रतकथेचे वक्ता श्रीकृष्ण आणि मार्कंडेय आहेय तर श्रोता युधिष्ठिर तसेच हेममाली आहे., जेव्हा युधिष्ठिर श्रीकृष्णाला आषाढकृष्ण एकादशीचे नाव आणि महत्त्व विचातात तेव्हा वासुदेव ही कथा सांगतात.
पद्म पुराणानुसार धनाध्यक्ष कुबेर प्रभू महादेवाचे परम भक्त होते. दररोज महादेवाच्या पूजेसाठी त्यांनी हेम नावाच्या माळ्याला फुलं निवडून आणण्याचे काम सोपवले होते. एकेदिवस कामात वशीभूत होऊन हम आपल्या पत्नीसह विहार करू लागला आणि वेळेवर फुलं पोहचवण्यात असमर्थ ठरला. तेव्हा क्रोधित होऊन कुबेर महाराजांनी सैनिकांना हेम माळ्याच्या घरी पाठवले. सैनिकांनी हेम माळी फुलं का आणू शकला नाही हे कारण सांगितल्यावर कुबेर आणखीच क्रोधित झाले. कुबेराने हेम माळ्याला कुष्ठ रोगाने पीडित होऊन पत्नीसह पृथ्वी जाण्याचा श्राप दिला. कुबेरच्या श्रापामुळे हेमला अलकापुरीहून पृथ्वीवर यावे लागले. एकदा ऋषी मार्कण्डेय यांनी हेमच्या दुःखाचे कारण जाणून घेल्यावर योगिनी एकादशी व्रत करण्याचा सल्ला दिला. या व्रतामुळे श्राप मुक्त होऊन पत्नीसह सुखरूप जीवन व्यतीत करू लागला.
एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित केले जाते. योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसह पिंपळाचीही पुजा केली जाते. असं म्हणतात योगिनी एकादशीचे व्रत केल्याने ८८ हजार ब्राम्हणांना दान दिल्याचे फळ मिळते.
तामसिक भोजन करणे टाळावे शास्त्रांप्रमाणे ही एकादशी करण्याच्या एका दिवसापूर्वी रात्रीपासून नियम पाळणे सुरू करावे. दशमी तिथीच्या रात्रीपासून ते द्वादशी तिथीच्या सकाळ पर्यंत दान कर्म करण्याने पाप नष्ट होतात. म्हणूनच दशमी तिथीपासूनच तामसिक भोजन करणे टाळावे. पुराणांमध्ये या व्रताला खूप महत्त्व दिले गेले आहे. या व्रत दरम्यान प्रभू विष्णू जागृत अवस्थेत असतात. नंतर देवशयनी एकादशी येते. ज्यानंतर प्रभू विष्णू चार महिन्यांसाठी शयन करतात.
या दिवशी भक्त उपवास करतात. तर दुसऱ्या दिवशी सुर्योदयाच्या वेळेस उपवास सोडला जातो. या व्रताच्या दशमी तिथीला रात्रीपासून तामस भोजन सोडून साधे भोजन ग्रहण केले पाहिजे आणि ब्रम्हचर्येचे पालन केले पाहिजे. कुंभ स्थापना करून त्यावर भगवान विष्णूची प्रतिमा ठेवून त्याची पुजा केली पाहिजे. पुजेदरम्यान भगवान विष्णूला पंचामृताने स्नान घालावे. पुष्प, धूप, दीप आदिने आरती करून त्यानंतर पंचामृत घरातील सर्व व्यक्तींवर शिंपडावे. पुजेदरम्यान विष्णू सहस्त्रनामालाही मोठे महत्त्व आहे. या एकादशीच्या दिवशी दिलेले दानाला खूप मोठे महत्त्व आहे. शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारचे दान करताना ब्राम्हणाला तसेच अन्य व्यक्तीला दक्षिणा जरूर द्यावी.
योगिनी एकादशीच्या दिवशी दान देण्याचं देखील महत्त्व आहे. या दिवशी जल आणि अन्न दान करणे फलदायी ठरतं. तसेच कोणी आजारामुळे त्रस्त असेल तर या दिवशी प्रभू विष्णूंची उपासनासोबतच सुंदर कांड पाठ करवणे फलदायी ठरेल.
यात एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम स्नान आणि नित्यकर्माहून निवृत्त होऊन व्रत संकल्प घेण्याचा विधान आहे. पद्म पुराणानुसार या दिवशी तिळाच्या उटणे लावून नंतर स्नान करणे देखील शुभ मानले गेले आहे. या व्रतामध्ये प्रभू विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा विधान आहे.
पूजन करताना सर्वात आधी प्रभू विष्णूंना पंचामृताने स्नान करवावे. नंतर प्रभू विष्णू ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. नंतर चरणामृत स्वत: आणि कुटुंबाच्या सदस्यांवर शिंपडावे आणि तीर्थ म्हणून ग्रहण करावे. असे केल्याने शरीराचे सर्व आजार आणि वेदना नाहीश्या होतात असे मानले गेले आहे. विष्णुसहस्त्रनाम पाठ करावा.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: webdunia
View Comments
Khup chan mahiti dili mharaj tya badal mi aapla aabhari aahe
धन्यवाद महाराज